माझं जग...माझं आभाळ

माझं जग...माझं आभाळ
थोडंसं वास्तव परिस्थिती पासून दूर जाऊन, कधी एक-एकट तर कधी कोणी सोबत घेऊन ...

Sunday, December 26, 2010

DeaR


अजूनही तुझा आवाज कानात घुमतोय बघ...
'बाकी सर्व खुशाल...तुझ्यासारखं...'
DeaR आलं यातच सारं, नाही का?
असो...
मला एक सांग कशी दिसत असशील गं आता...
खात्री आहे....तशीच असशील... 'माझी वाली'
.....निरागस, कावरी-बावरी....
कृत्रिम रंगाचा स्पर्श.... त्याची तुला कधी गरजच भासली नव्हती .....
आणि आताही ......हो खात्री आहे शंभर टक्के...
समोरच्याच्या आत्म्याला भिडणारी तुझी नजर ...अजूनही काळजात जपून ठेवलीय....
बराच काळ लोटून गेलाय असं वाटतं....नाही का गं....
कित्येकदा तुझ्या दारातून परतलोय....सातासमुद्रापार असलेल्या...
रोज दिवसभरात माहित नाही किती चकरा होतात....
मी मोजत नाही गं....पूर्वीसारखे हिशेब जमत नाहीत हल्ली....
तू फक्त एकदा दिसलीस कि होईल सर्व वसूल.......फक्त एकदाच
तुला आज पण असंच वाटतं का गं झालं ते सर्व माझ्यामुळे?
त्या दिवशी तुझ्या बोलण्यातून जाणवत होतं ते मला...
वाटलंच.....कधी भेटलेलीस? एवढा विचार नको करूस....
आता भेटते आहेस तशी गं...
तू भेटतच असतेस मला माझ्या विचारांमधून, स्वप्नांमधून....तर असो 
रागात पण गोड दिसतेस, आजपण...  
अगं हो हो DeaR .....किती त्रागा करून घेशील....
चुकलंच माझं...मोजायला हवं होतं.... तुझ्या-माझ्यातलं अंतर, ते अंतर कापण्यासाठीचा वेळ, मारलेल्या चकरा...
तुझ्या आठवणी, रात्रींचे दिवस, हरवलेले क्षण, गुदमरलेले श्वास, कोंडलेले शब्द, नरक-यातना.....अजूनही बरंच काही...
जमलंच नाही बघ अगणित कसं मोजायचं ते....
हिशेबांना जरा डोके लावले असते तर .....
पण छ्या .....प्रेमात डोकं कमीच लावलं......असं तुझं म्हणणं....
वेडाबाई ....मनात तुझ्या कधी डोकावलो नाही मी......?
फक्त मान उंचावून तुला बघत राहिलो....
अगदी खरं सांगतोय.....आज पण तिथूनच बोलतोय.....तुझ्या मनासारखी प्रशस्त जागा कुठेच नाही....
सात समुद्रापार माझा आवाज पोहोचतोयना .....
आणि ते सात असू देत कि सात हजार, फरक पडेल का???
आणि जखमांचे काय घेऊन बसलीस DeaR?
जखमा होतात त्या शरीराला, तुटलेल्या भागाचे काय ..... निर्जीवच
केला ना माझा जीव दुसऱ्याच्या स्वाधीन?
आपल्यामध्ये समुद्र आणले नाही गं DeaR मी .....ते यायचेच होते......
विरहाचे म्हणशील तर.... शरीरापुरते .......समुद्र दोन शरीरांमध्ये आलेत.....
आजही मी पाहतोय गं तुला....शेवटचे कोणते ठरेल माहीत नाही......
जाणून घ्यायचेही नाही....
- फक्त तुझाच 
शेवटच्या श्वासापर्यंत...त्यानंतरही...

6 comments:

  1. स्त्री असून पुरुषांच्या भावना बरोबर ओळखता तुम्ही....

    ReplyDelete
  2. आभारी आहे राजेंद्रजी,
    मी असे ऐकलंय की प्रत्येक पुरुषामध्ये एका स्त्रीचं मन आणि प्रत्येक स्त्री मध्ये एका पुरुषाचं मन दडलेलं असतं.
    आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती येते की आपण तिच्याशी अगदी एकरूप झालेले असतो.
    आता सगळं संपलं, असं असताना. यापुढे आमची भेट शक्य नाही. अशी कल्पना करून; माझ्या 'खास' व्यक्तीच्या मनात काय काय घालमेल चाललीय, माझी 'ती' व्यक्ती मनातल्या मनात माझ्याशी काय संवाद साधते, तिचे माझ्या बद्दलचे विचार अचूक तर नाही मांडू शकत मी. निदान निदान 'अंदाज' तर नक्कीच करू शकते. बस ते मांडण्याचा इथे एक प्रयत्न केला.

    ReplyDelete
  3. Hello Shasha,
    Thanks for your comment. खरं म्हटलेस अगदी की प्रत्येक पुरुषामध्ये एका स्त्रीचं मन आणि प्रत्येक स्त्री मध्ये एका पुरुषाचं मन दडलेलं असतं. ज्यांना भावना असतात त्यांना दुसर्‍याच्या मनातले न सांगता कळते. आणि सांगूनच साध्य करावे लागत असेल तर त्या नात्याचा काय अर्थ?

    ReplyDelete
  4. छान लिहाल आहे ,खूप भावूक व्हायला होत वाचतांना...तुमच्या मध्ये दडलेल्या पुरुषी मनाला शब्दातून चांगला न्याय दिलात ...

    ReplyDelete
  5. मोनिका,
    माझ्या 'पंटर लोग' मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद...
    >>सांगूनच साध्य करावे लागत असेल तर त्या नात्याचा काय अर्थ?
    मोनिका अगदी बरोबर बोललीस बघ. 'खरं-खुरं जिव्हाळ्याचं नातं' मग ते रक्ताचं असो... नसो, का. भा. पो. साठी एकमेकांचं मन ओळखणं गरजेचं असतं.
    अधून-मधून येत जा गं अशीच भेटायला... :)

    ReplyDelete
  6. देव,
    खूप खूप आभारी आहे. प्रतिक्रिया आवडली. भेट देत रहा.

    ReplyDelete